एक्स्प्लोर
Latur Acident: अचानक धावत्या एसटीचं स्टेअरिंग झालं जाम, बस थेट पुलावरुन खाली पडून भीषण अपघात
Latur Acident: वेगानं जाणाऱ्या एसटीचं अचानक स्टेअरिंग जाम झाल्यानं भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 30 प्रवासी जखमी झाले आहेत.

Latur Accident News Updates
1/10

Latur Acident Updates: लातूरमध्ये आज (मंगळवारी) सकाळी भीषण अपघात झाला.
2/10

स्टिअरिंग रॉड जाम झाल्यानं एसटी बसचा भीषण अपघात झाला.
3/10

लातूर आगारातून मंगळवारी सकाळी एसटी बस पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. या एसटीचा अपघात झाला.
4/10

पुणे-वल्लभनगर एसटी बस बोरगाव काळे नजीक आली असता, अचानक स्टिअरिंग रॉड जाम झाल्यानं बस पुलाच्या खाली घसरली.
5/10

अपघात झाला त्यावेळी एसटी बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते.
6/10

अपघातग्रस्त बसमधील तब्बल 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
7/10

स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं.
8/10

जखमींना तात्काळ उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
9/10

एकूण जखमींपैकी 14 जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय दवाखान्यात हलवण्यात आलं आहे.
10/10

सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Published at : 17 Jan 2023 01:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
