एक्स्प्लोर
Jyotiraditya Shinde In Kolhapur : ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; युवकांशी साधला संवाद, प्रति पंढरपूर नंदवाळमध्ये घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन
ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रति पंढरपूर नंदवाळ येथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. आपल्या देशाची क्षमता मोदी यांनी ओळखली आहे, त्यांचे विचार व कल्पनांना युवकांनी बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Jyotiraditya Shinde In Kolhapur
1/13

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लोकसभा प्रवास योजनेतंर्गत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामाचे उद्धाटन तसेच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
2/13

करवीर तालुक्यातील म्हाळुंगेत ज्योदिरादित्य शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
3/13

यावेळी त्यांनी योजनेच्या उपस्थित सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला.
4/13

करवीर तालुक्यातील कांडगावात ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणार्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
5/13

ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रति पंढरपूर नंदवाळ येथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
6/13

गडहिंग्लजमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 'किसान सन्मान निधी लाभार्थी शेतकरी संवाद मेळावा' पार पडला.
7/13

आपल्या देशाची क्षमता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ओळखली आहे, त्यांचे विचार व कल्पनांना युवकांनी बळ द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
8/13

पंतप्रधान मोदी यांच्या नवीन विचार व संकल्पनावर देश प्रगतीची शिखरे गाठत असल्याचे ते म्हणाले.
9/13

कोल्हापूर जिल्ह्यात सहकार, पर्यटन, उद्योग वाढीला चांगला वाव आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असेही त्यांनी सांगितले.
10/13

कोल्हापूर येथील विमानतळासाठी 280 कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
11/13

दरम्यान, शिंदे यांनी सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट दिली.
12/13

सरसेनापती प्रतापराव गुर्जरांसह सात वीरांच्या इतिहास, स्मृती-संग्रामातून देश कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
13/13

केंद्रीय मंत्री शिंदे यांनी युवकांशी संवाद साधल्यावर त्यांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. वीज, आरोग्य व इंटरनेटच्या सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याचे सांगितले.
Published at : 01 Mar 2023 11:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम























