एक्स्प्लोर
कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची गर्दी
Bhima Agriculture Exhibition : भव्य भीमा कृषी प्रदर्शनाचे कोल्हापुराती मेरी वेदर मैदानावर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. चार दिवस हे प्रदर्शन चालणार आहे.
Bhima Agricultural Exhibition
1/10

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरी वेदर ग्राऊंडवर 'भीमा कृषी प्रदर्शन'चे उद्घाटन करण्यात आले.
2/10

दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून वेगळी उत्पादने घेऊन पैसा मिळविणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
3/10

कृषी क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात आघाडीवर असून कोल्हापूरमध्ये पर्यटक वाढले, तर कोल्हापूरचा नकाशा बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
4/10

भीमा कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे प्रदर्शन असल्याचे सांगत त्यांनी धंनजय महाडिक यांचे कौतुक केले.
5/10

चार दिवस चालणाऱ्या भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
6/10

या प्रदर्शनामध्ये हरियाणाहून आलेला मुऱ्हा जातीचा 12 कोटी रुपयांचा बादशाह रेडा व त्याचीच बहीण 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस ही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली आहे.
7/10

बादशाह रेडा हा 4 वर्षांचा असून त्याचे वजन 1100 किलो असून सुखाचारा बाजरी, मका, ड्रायफ्रूट असे एक वेळ तो खाद्य खातो. त्याचा रोजचा खर्च चार ते पाच हजार रुपये आहे.
8/10

पाच ते सहा लाख लोक या प्रदर्शनाला चार दिवसांमध्ये भेट देऊन माहिती घेतात व आठ ते दहा कोटींच्या आसपास उलाढाल व अवजारे, ट्रॅक्टर शेती विषयक साहित्याची विक्री होत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
9/10

भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान, औषधे, खते, बी बियाणे, शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय यासंबंधी अद्ययावत साधनसामुग्री व माहिती उपलब्ध होणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
10/10

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवडे, माजी आमदार अमल महाडिक,माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजप महिला अध्यक्षा शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक जयंत पाटील, सुनील कदम, विशाल चोरडिया, प्रभास फिल्म्सचे सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.
Published at : 26 Jan 2023 04:13 PM (IST)
आणखी पाहा






















