एक्स्प्लोर
थरारक... शेतात काम करताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं डाव साधला; वृद्ध महिलेनं जागेवर जीव सोडला
मात्र, वनविभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
jalgaon news
1/7

जळगाव जिल्ह्यातील देवगाव शिवारात सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला.
2/7

इंदुबाई वसंत पाटील असं मृत महिलेचं नाव असून, त्या शेतात काम करत असताना हा हल्ला झाला.
3/7

दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या मागून येत डोक्यावर आणि चेहऱ्यावर जबरदस्त हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
4/7

घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्काळ इंदुबाई यांना जळगावच्या जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
5/7

गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढल्याचं ग्रामस्थांचे म्हणणं आहे. अनेक वेळा बिबट्याचे हलक्या झाडीत वा शेतात वावरताना फोटोही काढण्यात आले आहेत.
6/7

मात्र, वनविभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
7/7

ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, पुढे आणखी जीवितहानी होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Published at : 04 Aug 2025 05:59 PM (IST)
आणखी पाहा























