एक्स्प्लोर
Jalgaon Accident : कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; तीनजण गंभीर जखमी; भुसावळमधील घटना, पाहा फोटो
Car Accident : महामार्गावर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
Jalgaon Accident : कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; तीनजण गंभीर जखमी; भुसावळमधील घटना, पाहा फोटो
1/7

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ट्रकवर धडकल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
2/7

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
3/7

भुसावळ ते मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटले.
4/7

या भरधाव कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली.
5/7

या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
6/7

घटनास्थळी स्थानिकांनी मदत कार्य करत जखमींना तातडीने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
7/7

अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहे. महामार्गावर अवैधपणे उभे असलेल्या ट्रक आणि इतर वाहनांमुळे अपघातात वाढ होत असल्याचा आरोप होत आहे.
Published at : 19 Dec 2023 10:29 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















