एक्स्प्लोर
PHOTO : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार; फोटो होतायत व्हायरल
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे. रेल्वे मंत्रालयानं नव्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे फोटो शेअर केले आहेत.
India Delhi Railway Station
1/9

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे.
2/9

रेल्वे मंत्रालयानं नव्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे फोटो शेअर केले आहेत.
3/9

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या मॉडेलची छायाचित्रं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करताना रेल्वे मंत्रालयानं लिहिलं आहे की, "नवीन युगाची सुरुवात, नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्रस्तावित डिझाइन".
4/9

रेल्वे स्थानकाच्या नव्या रचनेसोबतच जागतिक दर्जाच्या सुविधाही प्रवाशांना दिल्या जातील, असं सांगितलं जात आहे. मात्र, त्या सुविधा काय असतील, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
5/9

या मॉडेलच्या निर्मितीनंतर दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात मोठं आणि आधुनिक स्थानक बनेल.
6/9

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या या डिझाइनवर वर्षाच्या अखेरीस काम सुरू होऊ शकतं.
7/9

या मॉडेलचं काम रेल्वे भूविकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला पीपीपीएसीकडून लवकरच मंजुरी मिळू शकते.
8/9

रेल्वे स्थानकावर बहुस्तरीय पार्किंगची सुविधा असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्किंग पूर्णपणे स्वयंचलित असेल.
9/9

रेल्वे मंत्रालयानं भावनगर रेल्वे स्थानकाचा जुना आणि नवीन फोटो शेअर केला आहे. हे छायाचित्र शेअर करत रेल्वे मंत्रालयानं 'न्यू इंडिया, नवीन रेल्वे स्टेशन्स' असं लिहिलं आहे.
Published at : 04 Sep 2022 11:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अहमदनगर
क्रिकेट
व्यापार-उद्योग



















