एक्स्प्लोर
PM Modi Birthday: नरेंद्र मोदींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून ॲडव्हान्समध्ये हटके शुभेच्छा; गाजरचा हलवा वाटप
PM Modi Birthday: मुंढवा चौकातील शिवसेनेच्या शाखेवरच हे बॅनर लावण्यात आले आहे.
PM Modi Birthday
1/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाढदिवसाच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
2/6

येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे.
3/6

मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पुण्यातील मुंढवा परिसरात लागलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
4/6

बॅनरवर लिहलंय, 'भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांच्याप्रमाणे वयाची 75 वी झाल्यामुळे राजकीय संन्यास घेऊन राजीनामा देतील... वाढदिवसानिमित्त लहान मुलांना गाजराचा हलवा वाटप'
5/6

अशा आशयाचे बॅनर पुण्यातील मुंढवा परिसरात लागले आहेत, यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
6/6

मुंढवा चौकातील शिवसेनेच्या शाखेवरच हे बॅनर लावण्यात आले आहे.
Published at : 14 Sep 2025 12:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























