एक्स्प्लोर

Rohit Pawar : अंतरवालीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला सगळ्यांनाच माहिती, त्याचं समर्थन करू नका; रोहित पवारांचे भुजबळांना उत्तर

Chhagan Bhujbal : अंतरवालीत लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते. त्यामुळे कुणाच्या आदेशाने तो लाठीचार्ज झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले.

अहिल्यानगर : भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे, अंतरवालीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला हे सगळ्यांनाच माहिती आहे असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी दिलं. कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी त्याने लाठीचार्जचं समर्थन करू नये असंही रोहित पवार म्हणाले. आंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीवरून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांवर आरोप केला. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

लाठीचार्जचे समर्थन करू नये

रोहित पवार म्हणाले की, "कदाचित छगन भुजबळ यांचा अभ्यास जरा कच्चा आहे. छगन भुजबळ यांना आणि सगळ्यांना देखील माहिती आहे की कोणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिला आणि मगच तिथे लाठीचार्ज झाला. तुम्ही एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता, मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते, आणि तिथे असणारा पोलीस हा केवळ गृहमंत्र्यांच्याच आदेश पाळू शकतो हे विसरता. त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये किंवा त्या लाठीचार्जचं समर्थन करू नये."

दंगलीमागे शरद पवारांचा आमदार, भुजबळांचा आरोप

अंतरवालीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये 83 पोलीस जखमी झाले. या दगडफेकीचे नियोजन आदल्या रात्री झालं होतं. त्या बैठकीला शरद पवार गटाचा आमदार उपस्थित होता असा आरोप छगन भुजबळांनी केला. त्या आमदाराला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाडल्याचंही भुजबळ म्हणाले होते.

शरद पवार भेटायला गेले म्हणून जरांगे मोठा झाला

महिला पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतरही शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे अंतरवालीत मनोज जरांगेच्या भेटीला गेले. त्यामुळे जरांगे मोठा झाला असा दावा छगन भुजबळांनी केला.

छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांच्या कन्या आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. भुजबळांबद्दल आदर आहे, त्यांच्याबद्दल बोलणार नाही असं म्हणत म्हणत हलकेच त्यांच्या जेलवारीची आठवण करुन दिली. छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर पुरावा काय असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी केला.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. लाठीचार्जच्या आदल्या रात्री दोन वाजता आमदारांनी भेट घेतली. यानंतर महिला पोलिसांवर तुफान दगडफेक झाली. पोलिस घरोघरी लपत होते अशी माहिती बापूसाहेब म्हणून आहेत त्यांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले. तसंच दगडफेकीमागे पवार आहेत असं वक्तव्य आपण केलं नाही असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Embed widget