एक्स्प्लोर
परमेश्वराचं बोलावणं आलं, आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, आम्ही देहासह वैकुंठाला जात आहोत; 20 भाविकांच्या निर्णयाने खळबळ
या निर्णयापासून त्यांना परातृव करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले असून मतपरिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
20 devotees from pune and karnataka says we are going to Vaikuntha
1/10

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील अनंतपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
2/10

परमेश्वराचे आम्हाला बोलावणे आलं असून आम्ही 8 सप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका भक्तांनी घेतली आहे.
3/10

देहत्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील भक्तांची संख्या अधिक आहे.
4/10

अनंतपूरमध्ये रामपाल महाराजांचा मठ असून देह त्यागाचा निर्णय घेतलेल्या भक्तांनी रामपाल महाराजांची दीक्षा घेतली आहे.
5/10

यामध्ये पुण्यातील दहा भाविकांचा समावेश आहे. तर अनंतपूर आणि विजयपूर इथल्या प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे.
6/10

मात्र, अन्य मठांच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्याने देहत्याग करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला.
7/10

अनंतपूर येथील एकाच इरकर कुटुंबातील पाच जणांनी देहत्यागाचा निर्णय घेतला आहे.
8/10

आता आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार आहेत. मात्र यामध्ये पुण्यामधील 10 भाविकांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
9/10

इरकर म्हणाले की, रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे. आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असून 8 सप्टेंबर रोजी परमेश्वराचे बोलावणे आले आहे.
10/10

त्यानुसार ६ सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होईल. 8 रोजी आम्ही देहासह वैकुंठी जाणार आहोत. 'परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Published at : 25 Aug 2025 11:16 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























