एक्स्प्लोर

Cylinder Rate : 22 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर स्वस्त होणार का? जीएसटीचे दर बदलल्यानंतर दर बदलणार का?

Cylinder Rate : 22 सप्टेंबरपासून जीएसटीमधील बदल देशभरात लागू होणार आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर कमी होणार आहेत.

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या बैठकीत 3 सप्टेंबरला जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले. आता 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब कायम आहेत. अन्न पदार्थ, कापड, कार, एसी, टीव्ही यासारख्या वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. जीएसटी दरातील बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

नव्या जीएसटी रिफॉर्मनुसार अनेक वस्तू 22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. अन्न पदार्थांपासून दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. एलपीजी सिलेंडरचे दर कमी होणार का याबाबत माहिती लोकांकडून घेतली जात आहे.

एलपीजी सिलेंडरवर किती टक्के जीएसटी? LPG Cylinder GST Rate

सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आकारते. घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटी परिषदेकडून सिलेंडर दरावरील जीएसटी दरात बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच एलपीजीवरील जीएसटी कमी होणार नाही.

22 सप्टेंबरपासून इतर वस्तूंचे दर बदलले तरी घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर बदले जाणार नाहीत. सिलेंडरचे दर कायम राहतील. घरगुती वापराच्या सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी आणि 18 टक्के जीएसटी लागू असेल.

जीएसटी परिषदेच्या 3 सप्टेंबरला झालेल्या जीएसटी काऊन्सिलमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेनं मोठे बदल केले आहेत. 2017 मध्ये जीएसटी लागू करण्यात आलं होतं. परिषदेनं दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून आरोग्य, शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कृषी उपकरणं, विमा,ऑटोमोबाईलवरील जीएसटी घटवला आहे.

तंबाखू सारख्या उत्पादनांवरील जीएसटी 40 टक्के आहे. शीतपेयांवरील जीएसटी देखील 40 टक्के आहे. सुपर अलिशान कारवरील जीएसटी 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget