एक्स्प्लोर
PM Meets ISRO Scientists : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट! पाठीवर शाबासकीची थाप देत म्हणाले...
PM Modi Meets ISRO Scientists : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरुमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं कौतुक आणि अभिनंदन केलं.

PM Modi Meets ISRO Scientists
1/10

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून थेट बंगळुरूला पोहोचले आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचले.(PC:PTI )
2/10

भारताच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. (PC:ISRO)
3/10

चांद्रयान-3 च्या मोहिमेसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बेंगळुरूमधील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. त्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. (PC:PTI )
4/10

भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेच्या यशात सहभागी महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.(PC:PTI )
5/10

(PC:PTI )
6/10

इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. पंतप्रधानांनी इस्रो प्रमुख सोमनाथ यांना मिठी मारली आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.(PC:PTI )
7/10

पंतप्रधान जेव्हा कमांड सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा शास्त्रज्ञांनी 5 मिनिटे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केलं. (PC:PTI )
8/10

इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आज तुमच्यामध्ये येऊन मला खूप आनंद झाला आहे. मी तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होतो. ब्रिक्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो, पण मी मनाने पूर्णपणे तुमच्यासोबत होतो.''(PC:PTI )
9/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''भारत तेथे पोहोचला आहे, जिथे कोणीही पोहोचले नव्हतं.'' चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतरही पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता.(PC:PTI )
10/10

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''हा आजचा भारत आहे. निर्भय भारत, लढणारा भारत. नवा विचार आणि नव्या पद्धतीने विचार करणारा हा भारत आहे. जो अंधारातही जगात प्रकाश पसरवतो.''(PC:PTI )
Published at : 26 Aug 2023 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
