एक्स्प्लोर
Gadchiroli ST Bus : पहिल्यांदाच एसटी पोहोचलेलं गाव, नक्षलग्रस्त भागात जल्लोषात स्वागत, पाहा Photos
Gadchiroli ST Bus : स्वातंत्राच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या कटेझरी गावात एसटी बस दाखल झाली. या बसचे गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Gadchiroli ST Bus
1/10

अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे.
2/10

गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर कटेझरी गाव आहे.
3/10

स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच शनिवारी (दि. 26) कटेझरी गावात बस दाखल झाली.
4/10

पोलीस दलाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या बस बघण्यासाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यासारख होता.
5/10

यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले.
6/10

सकाळी संपूर्ण गावकरी पहिल्यांदा येणाऱ्या या बसची आतुरतेने वाट बघत होते.
7/10

बसचे गावात आगमन होताच वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली.
8/10

यावेळी पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते चालक व वाहक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
9/10

गेल्या अनेक वर्षांपासून कटेझरी गावात बसची सोय नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
10/10

आता गावात बस दाखल झाल्याने विद्यार्थी, वयोरुद्ध नागरिक, रुग्ण आणि कटेझरीच्या नागरिकांसोबत परिसरातील 8 ते 10 गावांना बसमुळे फायदा होणार आहे.
Published at : 27 Apr 2025 09:15 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























