एक्स्प्लोर
Gadchiroli: नक्षल्यांचे भय निवळताच विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याची कास; नक्षलप्रभावित, दुर्गम हेडरी गावात LIFचा अनोखा उपक्रम
Gadchiroli Naxal News : नक्षल प्रभावित भागात नक्षल्यांचे भय निवळताच येथील पुढच्या पिढीनं शिक्षणाची कास धरत उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचे ठरवलं असल्याचे समोर आले आहे.
Gadchiroli News
1/8

Gadchiroli: केंद्र सरकारने देशाला नक्षलमुक्त (Naxal) करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. हे लक्षात घेता, पोलिसांनी नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. किंबहुना नक्षल्यांच्या तळावर अखेरचा घाव घालण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आता कंबर कसली आहे. अशातच या नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात पोलिसांना मोठे यश देखील येत असल्याचे दिसून आले आहे. अशातच नक्षल प्रभावित भागात नक्षल्यांचे भय निवळताच येथील पुढच्या पिढीनं शिक्षणाची कास धरत उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचे ठरवलं असल्याचे समोर आले आहे.
2/8

अशातच गडचिरोलीच्या अगदी टोकावर आणि अतिशय दुर्गम अशा हेडरी गावात एक अभिनव आणि प्रथमच एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने हेडरी येथे ग्रामीण मुलांसाठी परिवर्तनात्मक उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन केलं आहे. एलआयएफने (LIF) सामुदायिक विकास उपक्रमांतर्गत 8 मे ते 18 मे या कालावधीत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी, हेडरी येथे दहा-दिवसीय उन्हाळी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले.
3/8

यात उन्हाळी शिबिरच्या माध्यमातून दररोज 500 हून अधिक मुले या शिबिरात उत्साहाने सहभागी झाली, ज्यात गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांतील मुले देखील समाविष्ट होती. 6 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना शारीरिक प्रशिक्षण, सर्जनशील शिक्षण, आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदर उन्हाळी शिबिराचे नियोजन केले होते.शिबीरादरम्यान मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे यासोबतच त्यांच्यात संघभावना (टीम स्पिरिट) जागृत करणे, तसेच त्यांच्या प्रतिभेला उजाळा देणाऱ्या उपक्रमांमध्ये ऍथलेटिक्स, धनुर्विद्या, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, नृत्य, कला आणि हस्तकला, आणि चित्रकला यांचा समावेश होता.
4/8

दरम्यान सुदूर आदिवासी भागातून सहभागी झालेल्या 90 मुलांसाठी LIFने प्रवास, निवास आणि पौष्टिक जेवण इत्यादी सोयीची सहर्ष व्यवस्था केली. उन्हाळी शिबिरातील सर्व सहभागींना क्रीडा पोशाख प्रदान करून त्यांच्यात सांघिक एकता निर्माण करण्यात आली. शारीरिक कवायतींव्यतिरिक्त शिबिरात पर्यावरण जागरूकता, सुरक्षा, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि रोजगार मार्गदर्शन या विषयावर मौल्यवान सत्रे घेण्यात आली.
5/8

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसोबत संवादात्मक सत्र हे शिबिराचे विशेष आकर्षण होते. ह्या सत्रात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील करिअर संधी, पोलिस विभागाचे कामकाज, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलिस भरती परीक्षांच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करून प्रेरित केले. याव्यतिरिक्त, लॉयड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी तसेच इतर क्षेत्रांमधील करिअर संधींबद्दल शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
6/8

शेवटच्या दिवशी झालेल्या समारोप समारंभात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, स्थानिक नेते, पोलिस अधिकारी आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL), LIF, आणि लॉयड्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड (LICL) मधील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिबिरार्थींच्या प्रभावी कलाकृतींचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या पालकांना अभिमान वाटला आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
7/8

पुरसलगोंदी ग्राम पंचायत च्या सरपंच अरुणाताई सडमेक, नागूलवाडी चे सरपंच नेवलुजी गावड़े, नागूलवाडी चे उप-सरपंच राजुभाऊ तिम्मा, तोडसा च्या सरपंच वनिता नरोटी-कोरामी, उडेरा चे सरपंच गणेश गोठा, बुर्गी चे सरपंच विलास गावड़े, बुर्गी चे पोलीस पाटील सौरव कावड़ो, मोहोरली चे पोलीस पाटील कोमती गावड़े, कुदरी चे पोलीस पाटील विजय तिम्मा, नागूलवाडी चे पोलीस पाटील माधव गावड़े, पेठा चे पोलीस पाटील दसाजी कोरामी, एकरा खुर्द चे पोलीस पाटील रामा गोटा, आणि इतर मान्यवरांनी ह्या प्रसंगी विशेष उपस्थिती दर्शविली.
8/8

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक तथा लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनचे संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “हे शिबिर केवळ निखळ आनंद आणि खेळांबद्दल नव्हते तर ते स्वप्ने, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया बांधण्याबद्दल होते. मुलांना त्यांच्या आवडी शोधताना आणि नवीन मैत्री निर्माण करताना पाहणे आमच्यासाठीही आनंददायी अनुभव होता.”
Published at : 21 May 2025 03:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















