एक्स्प्लोर
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
जाम लागल्याने वाहनांची सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांबच लांब रांग लागली होती. त्यामुळे एका गरोदर महिलेला सुद्धा 5 तास या जाम मध्ये फसून राहावे लागले
National Highway gadchiroli
1/6

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची - कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास छत्तीसगड येथून बेंगलोरकडे जात असलेला ट्रक नादुरुस्त झाला आणि तब्बल 12 तासांचा येथे जाम लागला.
2/6

जाम लागल्याने वाहनांची सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांबच लांब रांग लागली होती.
3/6

त्यामुळे एका गरोदर महिलेला सुद्धा 5 तास या जाम मध्ये फसून राहावे लागले तसेच काही चिमुकले सुद्धा पाणी व जेवणाविना रस्त्यातच रात्र काढली
4/6

एका शासकीय बस मध्ये सुद्धा प्रवास करणाऱ्या 40 प्रवास्यांना सुद्धा तब्बल 5 तास वाट बघावी लागली.
5/6

या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 8 किलोमीटर वळण घाट असून या मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते.
6/6

परंतु रस्ता अतिशय संकीर्ण असल्यामुळे नेहमी या मार्गावर वाहने नादुरुस्त होऊन उभे असतात.
Published at : 26 May 2025 06:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























