एक्स्प्लोर
Ravikant Tupkar Accident: कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेवरून परतताना रविकांत तुपकरांच्या वाहनाचा अपघात; मद्यधुंद ट्रक चालकाने पाठीमागून दिली धडक
Ravikant Tupkar Accident: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ravikant Tupkar Accident
1/6

धाराशिव: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघातांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/6

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पारगाव टोल नाक्याजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने तुपकर यांच्या इनोवाला दिली पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
3/6

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर लातूर जिल्ह्यात जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.
4/6

तुपकरांच्या कार चालकाने दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, बीडकडे जाणाऱ्या लेनमध्ये टोल भरण्यासाठी थांबलो. तेव्हा पाठीमागून त्यांच्या ईनोव्हा कारला कोणीतरी जोरदार धक्का दिल्याचे जाणवले व मोठा आवाज आला व गाडी थोडी पुढे सरकली.
5/6

त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी गाडीतुन खाली उतरून मागे पाहिले असता आमच्या गाडीला पाठीमागुन ट्रकने धडक दिल्याचे लक्षात आले. ट्रकमध्ये एक क्लिनर व ड्रायव्हर बसलेले होते.
6/6

त्यानंतर मी ट्रकचे चालकांकडे त्याचे नाव गावाबाबत विचारणा केली असता त्याने अडखळत्या आवाजात त्याचे नाव संभाजी विटठल डोंगरे रा, संभाजी चैक पंढरपुर असे असल्याचे सांगितले.
Published at : 18 May 2025 07:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























