एक्स्प्लोर
झोपडीत राहणारी 'परी', उद्धव ठाकरेंनी पूरबाधित गरिबाचं घर पाहिलं; चिमुकलीला जवळ घेऊन नाव विचारलं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा करत आज लातूर, धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊन, बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडे मागणीही केली.
Uddhav Thackeray in dharashiv farmers home
1/9

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा करत आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊन, बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडे मागणीही केली.
2/9

धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील ईटकुर येथील महिलेच्या घरात पावसाचं पाणी शिरलं होतं, उद्धव ठाकरे ईटकूर गावात नुकसानग्रस्त शेती आणि शेतकऱ्यांच्या घरातील पूरस्थिती पाहणी करायला आले होते.
3/9

उद्धव ठाकरे पाहणीसाठी आल्यानंतर ईटकूर गावातील महिलेने त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महिलेच्या पत्र्याच्या शेडमध्ये वसलेल्या घरी जात पाहणी करत धीर दिला
4/9

कळंब तालुक्यातील इटकूर गावातील शिलाताई मोरे ह्यांच्या घरात पाणी शिरले होते, त्या घराची पाहणी उद्धव ठाकरे ह्यांनी केली. यावेळी, घरातील चिमकुल्या मुलीला जवळ घेत उद्धव ठाकरेंनी तिचं नाव विचारलं, तेव्हा तिने परी नाव सांगताच व्वा... म्हणत संवाद साधला.
5/9

उद्धव ठाकरेंसमवेत यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी भोवतालच्या नुकसानीची माहिती उद्धव ठाकरेंना दिली.
6/9

बळीराजाच्या आनंद अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय, तो आनंद पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही बळीराजासोबत आहोत, असे म्हणत पीडित पूरग्रस्त कुटुंबीयांस धीर देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.
7/9

लातूर जिल्ह्यातील कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाचीही उद्धव ठाकरे ह्यांनी आज पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्यांची व्यथा जाणून घेतली.
8/9

उभं पीक पाण्याखाली गेलंय आणि शेतीच्या बांधावरून बळीराजा मदतीसाठी सरकारकडे आक्रोश करतोय पण सरकार मात्र मदतीची कोणतीच ठोस शाश्वती देत नाहीय, अशावेळी बळीराजाने करायचं काय?
9/9

दरम्यान, आपल्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी बळीराजाला धीर देत, सरकारकडे तुमच्या व्यथा मांडू, मदत मिळवून देण्यासाठी आवाज उठवू असे आश्वासन दिले
Published at : 25 Sep 2025 07:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























