एक्स्प्लोर
Dharashiv Solapur Heavy Rain: गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
Rain Updates Maharashtra: मराठवाड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने भयावह परिस्थिती.
Dharashiv and Solapur Heavy Rain
1/12

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. येथील सिरसाव गावामध्ये घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. लहान मुलांची शाळेची पुस्तकं, वह्या घरात पाणी शिरल्याने भिजल्या.
2/12

ही लहान मुले आता आपली शाळेची पुस्तकं आणि वह्या सुकवत आहेत. हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारे आहे.
3/12

चांदणी नदीला गंभीररीत्या महापूर नागरिक ही पाण्यात अडकून बसले होते. याचबरोबर पशुधनाची ही मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्याचे शालेय साहित्यही ओले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
4/12

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हैदोस, आंबी गावात घरात शिरलं पाणी. घरात सर्वत्र चिखल, संसार उघड्यावर, घरातील सामान पडलं अस्ताव्यस्त
5/12

माढा तालुक्यातील उंदरगाव येथे संपूर्ण गावाला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे
6/12

माढा तालुक्यातील सोळा गावांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेक ग्रामस्थ आपल्या घरात सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे
7/12

माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांना व्यवस्थित सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
8/12

करमाळ्यातील संगोबा येथे 90 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे. सीना नदीने पाण्याचे पात्र सोडल्याने महापुराची भीषण परिस्थिती.
9/12

करमाळा. सिना नदीला आलेल्या महापुरामुळे करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण गावचा दोन्ही बाजूने संपर्क तुटला आहे. सिना नदी काठच्या अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान.
10/12

माढा तालुक्यातील वाकाव आणि उंदरगाव येथे पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एअरलिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्याची आमदार अभिजीत पाटील यांची जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी
11/12

माढा तालुक्यातील घरांना पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
12/12

सोलापुरातील पुराच्या पाण्याचे ड्रोन दृश्य.
Published at : 23 Sep 2025 09:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























