एक्स्प्लोर
Temple Dress Code : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्येही आता 'ड्रेसकोड'; पाहा फोटो
Temple Dress Code : गेल्या काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना ड्रेसकोड (Dress Code) परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
Temple Dress Code
1/8

आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
2/8

संभाजीनगर शहरांतील वेगवेगळ्या 20 मंदिरात ड्रेसकोडबाबत फलक लावण्यात आले आहे.
3/8

शहरातील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
4/8

मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरेला शोभणारीच वस्त्रे परिधान करावीत, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे.
5/8

अश्लील, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असे निर्णय घेत त्याबाबत मंदिरात फलक लावण्यात आले आहेत.
6/8

छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील असेच फलक लावण्यात आले आहे.
7/8

शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे.
8/8

फॅशनच्या नावाखाली तरुणींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट तसेच लोअर घालून मंदिरात येऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहेत.
Published at : 05 Jul 2023 12:15 PM (IST)
आणखी पाहा























