एक्स्प्लोर

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

Bhaskar Jadhav: चहापानाच्या पारंपरिक निमंत्रणाला सरळ बहिष्कार जाहीर करत, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर लोकशाहीचा सरळ अपमान केल्याचा ठपका ठेवला.

Bhaskar Jadhav: महायुती सरकारच्या एककल्ली, मनमानी आणि भ्रष्ट कारभारावरून महाविकास आघाडीने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अक्षरशः  वाभाडे काढले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि  ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी लोकशाहीचा पाया हादरवणाऱ्या निर्णयांपासून ते लाखो कोटींच्या भ्रष्टाचारापर्यंत आणि शेतकरी, कामगारांच्या मूलभूत योजनांना बंद पाडण्यापर्यंत सरकारने सर्वच सीमारेषा ओलांडल्या असल्याचा आरोप केला. सरकार कायद्याचा धाक नष्ट करत आहे. मुख्यमंत्री/गृहमंत्र्यांकडून लगेच 'क्लीन चिट' दिली जाते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

विरोधी पक्षनेतेपदाची दोनही पदे रिक्त ठेवणे हा घटनेचा अवमान 

हापानाच्या पारंपरिक निमंत्रणाला सरळ बहिष्कार जाहीर करत, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेतेपदाची दोनही पदे रिक्त ठेवणे हा घटनेचा अवमान असल्याचे ते म्हणाले. “ही केवळ परंपरा नसून बाबासाहेबांनी दिलेले संवैधानिक पद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचा सरकारचा दावा ‘संपूर्ण खोटा’ असल्याचे सांगत त्यांनी प्रधान सचिवांच्या लेखी उत्तराकडे बोट दाखवले.

अर्धा महाराष्ट्र विकलांग केला

भास्कर जाधव यांनी सांगितले की, दोन उपमुख्यमंत्री ही घटनेत कुठेही नसलेली तरतूद असूनही राजकीय तडजोडीसाठी सरकारने हे पद निर्माण केले आणि आज सत्ताधारी तीन पक्ष भ्रष्टाचाराच्या स्पर्धेत उतरले आहेत. विरोधकांच्या आमदारांना एक रुपयाही निधी न देऊन अर्धा महाराष्ट्र विकलांग केला असल्याचा आरोप केला. रोहित आर्या कंत्राटदार प्रकरणात सरकारनेच पुरावे नष्ट करण्यासाठी गोळीबार घडवून आणल्याचा थेट आरोप केला.  विधिमंडळातील परंपरांवर सवाल उपस्थित करणाऱ्या सभापती राम शिंदेंवरही भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. लोकशाही नको आणि मनुस्मृती हवी, हीच त्यांची मानसिकता आहे. सभापती पद दोन-अडीच वर्षे रिक्त ठेवून आता परंपरांचा दाखला देणारे शिंदे स्वतःच प्रश्नांकित ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

25 टक्के कमिशनची संस्कृती कर्जाच्या खाईत ढकलत आहे 

दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर आर्थिक अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचे भीषण चित्र उभे केले. मुंबई–पुणेठाणे विकासाच्या नावाखाली निवडक इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच निधी आणि 25 टक्के कमिशनची संस्कृती राज्याला कर्जाच्या खाईत ढकलत असल्याचा त्यांनी आरोप केला. 9,32,000 कोटी कर्जबाजारी राज्यात उत्पन्नाच्या 22 टक्के रक्कम केवळ कर्जफेडीतच जात असल्याने राज्याचा आर्थिक कणा मोडला असल्याचा आरोप त्यांनी केला. मेघा इंजिनिअरिंगच्या निविदेत 3,000 कोटींचा अतिरिक्त खर्च आणि कोर्टाने घेतलेली दखल, तसेच फक्त नऊ “लाडके” कंत्राटदारांकडे 1.67 लाख कोटींची कामे आहेत. अनेक कामे 33 टक्के वाढीव दराने असल्याने  भ्रष्टाचार किती खोलवर पोहोचला आहे हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पीक विमा’, ‘ग्राम सचिवालय’, ‘कामगार कल्याण’, ‘तीर्थ योजना’ अशा योजनांना सरकारने गाडून टाकल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला. अदानीच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील सात लाख कोटीच्या किंमतीच्या जमिनी कवडीमोल दराने सुपर्द केल्या गेल्या, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Embed widget