एक्स्प्लोर

Dhule Accident: कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात

Dhule Accident: धुळ्यातील साक्रीत दुर्दैवी अपघात. मजुरांची कच्चीबच्ची खेळताना अनर्थ घडला, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, तीन लहान मुली पाण्याने भरलेल्या विहिरीत गडप झाल्या.

Dhule Accident news: साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. या ट्रॅक्टरवर खेळत असलेली तीन लहान मुलं ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळल्याची (Dhule Accident news) प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाला वाचवण्यात यश आले असून दोन लहान मुलींचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस (Sakri Police) ठाण्याचे पीआय दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. (Dhule Marathi news)

प्राथमिक माहितीनुसार गणेशपूर शिवारात कांदा चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरु होते. काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते. खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु झाला व काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या अंदाजे 60 फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या चिमुकलींसह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली कोसळले. खुशी दाजू ठाकरे (वय 3 वर्ष), ऋतिका संदीप गायकवाड (3 वर्ष) हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले. तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र, पाच तासांपासून ट्रॅक्टरसोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अद्याप शोध न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
       
बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी 60 फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात  आले आहे. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदतकार्य व शोधकार्य गावकऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या ठिकाणी गणेशपूर सह परिसरातील दिघावे, कासारे, छाईल, सायने या गावातील ग्रामस्थ मदत कार्यासाठी सरसावले आहेत. 

आणखी वाचा

सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
Vasant More: वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
Vasant More: वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
Ind vs Nz 1st T20 Turning Point : सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट कोणता?
सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट कोणता?
Nagpur Crime News: एकतर्फी प्रेमाचा भयंकर अंत, विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीला संपवलं, नंतर मृतदेह फॅनला लटकावला अन्...; घटनेनं नागपूर हादरलं!
एकतर्फी प्रेमाचा भयंकर अंत, विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीला संपवलं, नंतर मृतदेह फॅनला लटकावला अन्...; घटनेनं नागपूर हादरलं!
Pune News: माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोलला, आता कारवाई, नेमकं प्रकरण काय?
माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोलला, आता कारवाई, नेमकं प्रकरण काय?
'निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी' म्हणणाऱ्या मनसे नेत्याला दिग्पाल लांजेकरांचं प्रत्युत्तर, स्पष्टच म्हणाले..
'निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी' म्हणणाऱ्या मनसे नेत्याला दिग्पाल लांजेकरांचं प्रत्युत्तर, स्पष्टच म्हणाले..
Embed widget