एक्स्प्लोर
Photo: नामांतराच्या समर्थनात छ. संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा, पाहा ड्रोन फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या समर्थनात भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता.
Photo: नामांतराच्या समर्थनात छ. संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा, पाहा ड्रोन फोटो
1/9

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचा स्वागत करत, सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनात आज शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला.
2/9

सकल हिंदू समाजाच्या वतीने 'हिंदू जनगर्जना मोर्चा' काढण्यात आला होता. तर इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्च्याला पाठींबा देत सहभाग नोंदवला आहे.
3/9

शहरातील क्रांती चौकातून साडेअकरा वाजेच्या सुमारास या मोर्च्याला सुरवात झाली होती.
4/9

पुढे जालना रोडवरून निराला बाजार मार्गे हा मोर्चा औरंगपुऱ्यातील फुले चौकात जाऊन पोहचला होता.
5/9

यावेळी फुले चौकात मोठा स्टेज उभारण्यात आला आणि यावरून अनेक नेत्यांची भाषणे देखील झाली.
6/9

सोबतच शहरातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
7/9

यावेळी मोर्चेकरांच्या हातात असलेल्या भगव्या झेंड्यामुळे निराला बाजार परिसर आणि औरंगपुरा चौक भगवेमय झाले होते.
8/9

मोर्चास्थळी बसण्यासाठी जागा नसल्याने औरंगपुरा परिसरात असलेल्या एका पाच मजली बिल्डींगवर बसून तरुणांनी सभा ऐकली.
9/9

विशेष म्हणजे या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून, पोलीस आयुक्त निखील गुप्ता स्वताः मोर्च्यास्थळी उपस्थित होते.
Published at : 19 Mar 2023 05:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























