एक्स्प्लोर
...अखेर महानगरपालिकेच्या मुख्यालयात लागला 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar News: केंद्र व राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...अखेर महानगरपालिकेच्या मुख्यालयात लागला 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक, पाहा फोटो
1/9

शासनाच्या या निर्णयानंतर आता शहरात सरकारी कार्यालये, महापालिकेच्या इमारतींवरीलऔरंगाबादचे फलक बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
2/9

दरम्यान दोन दिवसांपूर्वी महापालिकेने प्रवेशव्दार व प्रशासकीय इमारतीवरील औरंगाबाद नावाचे फलक काढले होते.
3/9

त्यानंतर शनिवारी (25 मार्च रोजी) महानगरपालिकेच्या टप्पा तीनमधील प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावण्यात आला आहे.
4/9

मात्र महापालिका आयुक्त आणि महापौर यांचे दालन असलेल्या मुख्यालयाच्या इमारतीवरील औरंगाबाद काढले असून, नवीन नाव अजून लावण्यात आलेले नाही.
5/9

महापालिकेतील औरंगाबाद नावाचा फलक बदलून, त्याजागी छत्रपती संभाजीनगर असा फलक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
6/9

त्यानुसार ठराव घेत महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नामफलक बदलण्याचे आदेश दिले होते.
7/9

प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीन इमारतीच्या नामफलकावरील औरंगाबाद हे नाव गुरुवारी काढून टाकण्यात आले.
8/9

त्यानंतर शनिवारी प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नामकरण करण्यात आले.
9/9

तसेच मुख्य इमारतीवरही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नाव लवकरच टाकले जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Published at : 26 Mar 2023 01:40 PM (IST)
आणखी पाहा























