एक्स्प्लोर

Pradnya Satav: भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही

Pradnya Satav joins BJP: काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Pradnya Satav joins BJP: राजीव सातव यांचं हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला हातभार लावण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसच्या (Congress) माजी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी केले. हिंगोलीतील (Hingoli news) काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने कालपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज सकाळी प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. प्रज्ञा सातव या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची बातमी समोर आल्या क्षणापासून त्यांनी हा निर्णय का घेतला, असा एकच प्रश्न विचारला जात होता. त्यावर प्रज्ञा सातव यांनी विकासाचे कारण पुढे केले. (Maharashtra Politics news)

मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. साहेब माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार  राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपूत्र होते. त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीही हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन काम केले होते. त्या दोघांसोबत राहून मी गेली 20 वर्षे एनजीओ, शिक्षणसंस्थांमध्ये काम करत होते. साहेबांच्या निधानंतर मला 2021 साली विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला सर्वांचं सहकार्य मला लाभलं. मी आज इथवर येण्याचा माझ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले. 

माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीव सातव यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे त्यामध्ये आम्हाला साथ द्यायची असल्याने आम्ही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीवभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ, सर्वजण मिळून करु संकटांवर मात. मी एवढंच आश्वासन देते की, मी आणि माझे कार्यकर्ते हे, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या धोरणाने काम करत राहू, असेही प्रज्ञा सातव यांनी सांगितले.

आणखी वाचा

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण असल्याची चर्चा; प्रश्नावरती थेट म्हणाले, 'अनेक दिवसापासून त्यांच्यासोबत...' 

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget