Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
Dhurandhar Box Office Collection Day 13: सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर दिग्गजांच्या सिनेमांसोबत स्पर्धा करुनही आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे.

Dhurandhar Box Office Collection Day 13: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) गाजत असलेली स्पाय अॅक्शन थ्रीलर फिल्म (Spy Action Thriller Film) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) फक्त हिट ठरली नाही, तर अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टार फिल्म ब्लॉकबस्टर (Blockbuster Film) ठरली आहे. 'धुरंधर' रिलीज होऊन तेरा दिवस झालेत, या तेरा दिवसांत सिनेमानं धुवांधार कमाई केली आहे. 'धुरंधर'नं अनेक दिग्गजांना धूळ चारली असून दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरची आपली पकड कायम ठेवली आहे. साधारणतः दुसऱ्या आठवड्यांत फिल्म्सच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळतं. पण, 'धुरंधर'च्या बाबतीत याउलट पाहायला मिळतंय. 'धुरंधर' जसजसा पुढे जातोय, तसतशी त्याच्या कमाईत बक्कळ वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.
'धुरंधर'ची 13व्या दिवसाची कमाई किती?
सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर दिग्गजांच्या सिनेमांसोबत स्पर्धा करुनही आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. या फिल्मनं पहिल्या आठवड्यात धुवांधार कमाई करुन अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. तसेच, दुसऱ्या आठवड्यात 'स्ट्रॉन्ग वर्ड ऑफ माउथ'मुळे 'धुरंधर'नं अख्खं बॉक्स ऑफिस हादरवलं. सध्या 'धुरंधर'मुळे बॉक्स ऑफिसवर पौशांचा पाऊस पडतोय. दुसऱ्या आठवड्यातही 30 कोटींपेक्षा जास्त कमाई करून 'धुरंधर' सर्वांना आश्चर्यचकीत करतोय. आश्चर्याची बाब म्हणजे, या फिल्मचे सकाळ, दुपारच्या शोऐवजी रात्रीचे शो हाऊसफुल्ल ठरत आहेत.
या सगळ्यात, चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 'धुरंधर'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 207.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर, आठव्या दिवशी 32.5 कोटी, नवव्या दिवशी 53 कोटी, दहाव्या दिवशी 58 कोटी, अकराव्या दिवशी 30.5 कोटी आणि बाराव्या दिवशी 30.5 कोटींची कमाई केली.
View this post on Instagram
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर'नं तेराव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 25.50 कोटींची कमाई केली. यासह, 'धुरंधर'ची एकूण 13 दिवसांची कमाई आता 437.25 कोटींवर पोहोचली आहे.
'धुरंधर'कडून 'बाहुबली'चा 10 वर्षांचा रेकॉर्डचा चक्काचूर
बॉक्स ऑफिसवर आलेल्या 'धुरंधर'च्या वादळामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. हा सिनेमा दररोज बक्कळ कमाई करतोय. रिलीजच्या तेराव्या दिवशी या सिनेमानं 437.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या बक्कळ कमाईनं 'धुरंधर'नं बाहुबलीचा दहा वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. 'धुरंधर'नं 2015 मध्ये प्रभासच्या सिनेमाच्या 421 कोटी रुपयांच्या एकूण कमाईला मागे टाकलंय. यासह 'धुरंधर' आता भारतीय चित्रपटसृष्टीतील तेरावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
'धुरंधर'चा आणखी एक धमाकेदार रेकॉर्ड
'धुरंधर'नं रिलीजनंतरच्या दुसऱ्या बुधवारी 25.50 कोटींची कमाई करुन एक मोठा रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे. खरं तर, हा चित्रपट दुसऱ्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, ज्यानं 'छावा'च्या 23 कोटी रुपयांच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























