एक्स्प्लोर
Photo: छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी दोन गटात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Photo: छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद
1/8

आज संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात (Ohar Village) देखील गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
2/8

रात्री झालेल्या वादानंतर आज सकाळी या गावात दगडफेकीची घटना घडली आहे.
3/8

यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
4/8

पोलिसांनी तत्काळ गावात धाव परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गावात सर्वत्र सध्या शांतता पाहायला मिळत आहे.
5/8

तर खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओहर तैनात करण्यात आला आहे.
6/8

गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरापासून 12 किलोमीटर असलेल्या ओहर गावात देखील रात्री राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाला होता.
7/8

रात्री झालेला वाद त्यावेळी मिटवला गेला. पण सकाळी पुन्हा दोन गटात दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
8/8

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
Published at : 31 Mar 2023 05:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























