एक्स्प्लोर

PHOTO : उपोषणकर्ता चार दिवसांपासून बेपत्ता, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या

बुलढाण्यात उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे.

Buldhana Social Activist Missing

1/11
बुलढाण्यात उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. रात्रंदिवस हा ठिय्या सुरु आहे.

2/11
ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच रात्र काढली. गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर हे चार दिवसांपासून बेपत्ता आहेत.

3/11
जिल्ह्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टाचार केला, असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या.

4/11
पण चौकशी किंवा कारवाई झाली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं आणि त्यांनी एकट्यानेच उपोषण सुरु केलं.

5/11
14 ऑगस्टला संतोष गाळकर हे पावसाळी दिवस असल्याने त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीत पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळवल्या होत्या.

6/11
उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन, त्या दिवशीही दखल घेतली नाही आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहून बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं.

7/11
संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्याने नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला. मात्र सायंकाळपर्यंत ते आढळून न आल्याने त्यांच्या मुलाने तामगाव पोलिसात वडील उपोषणस्थळाहून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

8/11
पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य तात्काळ ओळखून तक्रार दाखल करुन दोन पथक संतोष यांच्या शोधासाठी रवाना देखील केली. मात्र आता चार दिवस होऊनही संतोष गाळकर यांच्या बेपत्ता होण्याचं रहस्य उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

9/11
आता ग्रामस्थ आणि कुटुंबियांनीसंतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत.

10/11
दरम्यान संतोष गाळकर यांचा मुलगा सुपेश गाळकर याने आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे

11/11
तर गटविकास अधिकारी संजय पाटील म्हणतात ते गायब होण्यामागे आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.

बुलढाणा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?

Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget