एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023: अवघा रंग एक झाला... गजानन महाराजांच्या पालखीचे बीडच्या अंबाजोगाईत स्वागत; पाहा फोटो
Ashadhi Wari 2023 : टाळ-मृदुंगाच्या तालात आणि विठ्ठल नामजपात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Palkhi) बुधवारी (14 मे) रोजी अंबाजोगाई शहरात आगमन झाले.
![Ashadhi Wari 2023 : टाळ-मृदुंगाच्या तालात आणि विठ्ठल नामजपात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Palkhi) बुधवारी (14 मे) रोजी अंबाजोगाई शहरात आगमन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/d3a38fec90c8c1b9b4c2c58d3aab508e1686812120657737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gajanan Maharaj Palkhi in Beed
1/9
![अंबाजोगाई शहरात भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले. संत गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यास ठिकठिकाणी गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/1cb579de3ac7c025521f4f1866dbe1a34b2bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबाजोगाई शहरात भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले. संत गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यास ठिकठिकाणी गर्दी झाली होती.
2/9
![यावेळी गजानन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/b5e7267f3341f7e07d707c72fd8abcc0474d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी गजानन महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
3/9
![तर अंबाजोगाईकरांच्या सुख समाधानासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी यंदा पुरेसा पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/9425d817657de7ab4dbbf81b1557e126709b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर अंबाजोगाईकरांच्या सुख समाधानासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी यंदा पुरेसा पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले.
4/9
![आज सकाळपासून 11 किलोमीटरचा प्रवास करून गजानन महाराजांची पालखी दुपारचा विसावा लोखंडी सावरगांव घेणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/fe9e4fc4732301888632ced562cdfc19aeebd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळपासून 11 किलोमीटरचा प्रवास करून गजानन महाराजांची पालखी दुपारचा विसावा लोखंडी सावरगांव घेणार आहे.
5/9
![त्यानंतर पुढे आणखी 9 किलोमीटरचा प्रवास करत बोरी सावरगांव येथे मुक्काम करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/ed7eb5e27d1ee5a6e6e38c16b73b783c5402b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पुढे आणखी 9 किलोमीटरचा प्रवास करत बोरी सावरगांव येथे मुक्काम करणार आहे.
6/9
![आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दुपारी दोन वाजता अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौकात आगमन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/cadf8130cc329e03142c318dd2b70ec8c004e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दुपारी दोन वाजता अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौकात आगमन झाले.
7/9
![सायंकाळी सात वाजता योगेश्वरी मंदिरातून पालखी निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे ती शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विसावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/4921ac0047c35d439e73633188c1f6ff3e947.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी सात वाजता योगेश्वरी मंदिरातून पालखी निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे ती शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विसावली.
8/9
![तिथे आरती होऊन पालखीतील वारकऱ्यांनी एकादशीचा फराळ घेतला. दरम्यान पालखी मार्गावर महिलांनी सडा शिंपून आकर्षक रांगोळ्या मांडल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/cc01b03761c8a3a980a7b8489855608208501.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथे आरती होऊन पालखीतील वारकऱ्यांनी एकादशीचा फराळ घेतला. दरम्यान पालखी मार्गावर महिलांनी सडा शिंपून आकर्षक रांगोळ्या मांडल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
9/9
![रात्री या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला तर आज सकाळी पालखीचे लोखंडीसावरगावमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/05a1f193d9c314080729b1d4a39f093158f42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला तर आज सकाळी पालखीचे लोखंडीसावरगावमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
Published at : 15 Jun 2023 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)