एक्स्प्लोर
Beed Train: दशकांचं स्वप्न पूर्ण! बीडच्या रेल्वेस्थानकावर अखेर ट्रेनची शिट्टी वाजलीच, बीडच्या रहिवाशांमध्ये मोठा उत्साह
बीड स्थानकावर पहिल्यांदाच ट्रेनची शिट्टी ऐकू आल्याने बीडकरांनी स्टेशनवर उपस्थित असलेल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Beed Train
1/8

बीडमध्ये नागरिकांचं अनेक दशकांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच बीडच्या रेल्वे स्थानकावर रेल्वेची शिट्टी वाजली.
2/8

बीड जिल्हावासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हाय स्पीड रेल्वेची चाचणी यशस्वी पूर्ण झाली.
3/8

राजुरी ते बीड लोहमार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी यशस्वी झाली आहे.
4/8

मागील दोन दिवसात विघनवाडी ते राजुरी आणि आज राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावर ही चाचणी पूर्ण झाली आहे.
5/8

पहिल्यांदाच या लोहमार्गावर हाय स्पीड चाचणी घेण्यात आली. या लोहमार्गावर रेल्वे धावल्याने बीडकरांनी रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
6/8

रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही चाचणी घेण्यात आली. लवकरच या मार्गावर रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.
7/8

विघ्नवाडी रेल्वे स्थानकावरून ताशी 130 किलोमीटर वेगाने निघालेली ही ट्रेन दुपारी 1:45 वाजता स्टेशनवर आली. रहिवाशांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
8/8

रेल्वे संघर्ष समितीचे अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर उभे राहून ट्रेनचे स्वागत केले.
Published at : 06 Feb 2025 12:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
























