एक्स्प्लोर
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
बीड शहरात खुलेआम गुंडराज! घरासमोर नालीतील घाण टाकल्याच्या रागातून चहाच्या हॉटेलमध्ये घूसत फायटरने हल्ला, CCTV त काय घडले पहा
Beed Crime
1/8

बीड शहराच्या मोमिनपुरा भागात दिवसाढवळ्या मारहाण करतानाचा प्रकार समोर आला आहे.
2/8

. मोहम्मद खलील राशिद या तरुणावर नजीब खान उस्मान खान आणि खिजर खान शरीफ खान या दोघांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला.
3/8

या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
4/8

आरोपी आणि जखमी हे एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोर रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती.
5/8

या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरूनच आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
6/8

ही संपूर्ण घटना 19 जानेवारी 2025 रोजी एका हॉटेल च्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
7/8

बीड शहरात खुलेआम गुंडाराज आणि वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
8/8

आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का? कायद्याचा धाक आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
Published at : 06 Feb 2025 10:53 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या


















