एक्स्प्लोर

बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) कंपनीने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. या कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे.

Baba Ramdev : बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) कंपनीने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. या कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या FMCG कंपनी पतंजली फूड्सने कमाईचा विक्रम मोडला आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पतंजली फूड्सचा निव्वळ नफा 71.29 टक्क्यांनी वाढून 370.93 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने याबाबतची माहिती दिलीय. 

सर्वाधिक कमाई कोणत्या वस्तूमधून?

पतंजली फूड लिमिटेडच्या मते, त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत खाद्यतेल आहे. तेलातून त्याच्या कमाईत बंपर वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण कमाईपैकी 6,717 कोटी रुपये फक्त खाद्यतेल विभागातून आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 216.54 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. 9,103.13 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 7,910.70 कोटी होते. या कालावधीत, कंपनीचा खर्च वाढून रु. 8,652.53 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत रु. 7,651.51 कोटी होता. पतंजली फूड लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे. जर आपण एका वर्षाच्या परताव्याबद्दल बोललो, तर या कंपनीतील गुंतवणूकदारांना 19 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे, तर 5 वर्षात पतंजलीने आपल्या गुंतवणूकदारांना 78 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.

'या' गोष्टीवरील खर्च वाढला

पतंजली फूड्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली आहे. ग्राहकांमध्ये विश्वास टिकवण्यासाठी मार्केटिंगवर भरपूर पैसा खर्च केला आहे. बाबा रामदेव यांच्या कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत जाहिराती आणि विक्रीच्या जाहिरातींवर एकूण खर्चाच्या 2.5 टक्के खर्च केला आहे. गेल्या 10 तिमाहीत खर्च करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. कंपनीच्या ब्रँड प्रमोशनसाठी स्टार्सबद्दल बोलायचे तर, सध्या पतंजली शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, एमएस धोनी आणि भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यांच्यासोबत प्रमोशन करत आहे. पतंजली फूड्सने केवळ स्वत:साठीच नफा कमावला नाही तर गुंतवणूकदारांना बंपर नफाही दिला आहे. एका वर्षाच्या रिटर्नबद्दल बोलायचे झाले तर पतंजली फूड्सने गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा दिला आहे. तर 5 वर्षांत कंपनीने 78 टक्के बंपर परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या 1854 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:

Home Remedies For Body Detox: शरीराच्या आतील दूषित घटक झटपट बाहेर टाकेल रामदेव बाबांचा 'हा' उपाय; कसं तयार कराल डिटॉक्स वॉटर?

 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget