एक्स्प्लोर
PHOTO: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांनी 'अशी' काळजी घ्यावी!
asthama
1/9

दिवाळीचा (Diwali 2023) उत्साह सगळीकडे जोमाने पाहायला मिळतोय. सगळीकडे फटाके, आतषबाजींनी लहान मुलांपासून मोठ्यांचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, दिवाळीच्या या झगमगाटात एक गोष्ट अशी आहे जी लोकांना खूप त्रास देते.
2/9

अशा वेळी तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, दिवाळीत अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला त्रास देते. तर, दिवाळीच्या आनंदात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमधून निघणारा धूर दम्याच्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक असतो.
3/9

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फटाक्यांमधून अनेक प्रकारचे रासायनिक वायू बाहेर पडतात. ज्यामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. अशा वातावरणात दम्याच्या रुग्णांना श्वास घेताना त्यांचा त्रास खूप वाढतो. त्यामुळे या दिवाळीत दम्याच्या रुग्णांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
4/9

दिवाळीनिमित्त अस्थमाच्या रुग्णांना डॉक्टरांकडून विशेष सल्ला देण्यात येतो तो म्हणजे घराबाहेर पडताना नेहमी आपल्या बरोबर इनहेलर ठेवा. कारण धूर किंवा प्रदूषणामुळे त्यांना दम्याचा अटॅक कधी येऊ शकतो हे त्यांना कळत नाही. जर तुम्हाला अस्थमाच्या झटक्यापासून सुरक्षित राहायचं असेल, तर तुमच्याबरोबर इनहेलर ठेवणं हाच उत्तम उपाय आहे. आणि सतत औषध घेत रहा.
5/9

अस्थमाच्या रुग्णांना विशेष सल्ला असा आहे की, त्यांनी दररोज श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत. कारण तुम्ही केवळ व्यायामानेच दम्याचा त्रास कमी करू शकता. तुमची फुफ्फुस मजबूत करण्यासाठी रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे फुफ्फुसे मजबूत होतात.
6/9

दम्याच्या रुग्णांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तरच फटाक्यांमधून निघणारा धूर, घाण आणि वासापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. त्यामुळे मास्क नक्कीच वापरा.
7/9

दम्याच्या रुग्णांनी गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे. अशा वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बाहेर गेलात तरी मास्क नक्की वापरा.
8/9

अस्थमाच्या रुग्णांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही जो आहार घेत आहात तो निरोगी आमि पौष्टिक असेल याची खात्री करा. मिठाई आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (all photo: unplash)
Published at : 13 Nov 2023 02:15 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog


















