एक्स्प्लोर
PHOTO : 108 तासात होणार विश्वविक्रमी 75 किलोमीटरचा रस्ता; महाराष्ट्रात होणार विक्रम
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/9cb83ccae9fd5f68617000cf84a3f1ac_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
World record 75 km road in 108 hours;
1/10
![अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/338f72a2150347e942331eb50e694966b08fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते.
2/10
![पण आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/21c17195a0619577db6eb2f21018a0be76cce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम होणार आहे.
3/10
![काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी अमरावतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/fc2c9bd7b21bb5a0b9602690e396d689c2976.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी अमरावतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आली आहे.
4/10
![अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/e37600cbb4a8fc3000b547179daea928b6ece.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.
5/10
![राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/9d7844dd99f4d5530c403c4cd56885da40208.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ करणार आहे.
6/10
![हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/b722e851dc3ff889a8e7393f3288318b42acd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये होईल.
7/10
![राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/989e875e6b73eb7a55c01a9fee58cd99e3e6a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे.
8/10
![तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/69a04cf647ef5e3f9f60286a3c8a81943e4a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल.
9/10
![अमरावती ते अकोला मार्गाची सध्याची दुरावस्था पाहता हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. हा एक अनोखा प्रयोग या निमित्तानं समोर येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/926d44dc3e632461c8e9c4e25e027f41d6bc1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावती ते अकोला मार्गाची सध्याची दुरावस्था पाहता हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. हा एक अनोखा प्रयोग या निमित्तानं समोर येत आहे.
10/10
![अशा पद्धतीनं विक्रमी वेळात काम शक्य झाल्यास वेगाने रस्ते निर्मिती शक्य होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/cc2dd0c662a54b5a6d9d0c8872b923a3e956b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा पद्धतीनं विक्रमी वेळात काम शक्य झाल्यास वेगाने रस्ते निर्मिती शक्य होणार आहे.
Published at : 03 Jun 2022 01:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)