एक्स्प्लोर
Amravati News : कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारीचं यंदाचे 430वं वर्ष
Ashadhi Wari 2024: विदर्भाची पंढरी आणि रुख्मिनी मातेचे माहेर अशा श्रीक्षेत्र कौंडिण्यपूरच्या येथील श्री विठ्ठल-रुख्मिनी संस्थान तर्फे पंढरपूर वारीचे आज प्रस्थान होत आहे. यंदा वारीचे हे 430वे वर्ष आहे.

Ashadhi Wari 2024
1/10

विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशा श्रीक्षेत्र कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारीचे आज 11 जूनला प्रस्थान झाली आहे.
2/10

रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा हा गेल्या 430 वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे.
3/10

संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता.
4/10

वारीचे हे 430 वे वर्ष असून आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते.
5/10

मजल दरमजल करत रुक्मिणी मातेची ही पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करत असते. या पालखी सोहळ्यात विदर्भासह राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
6/10

वाशिष्ठा (वर्धा) नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी 1594 साली वारीला प्रारंभ केला.
7/10

आई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे.
8/10

आज या पालखी प्रस्थान सोहळ्या प्रसंगी मोठ्या संख्येने अमरावतीकर सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.
9/10

या पालखी सोहळ्याप्रसंगी वारकऱ्यांनी नाचत गाजत माऊलीचा गजर केला.
10/10

या पालखी सोहळ्यामुळे अमरावतीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Published at : 11 Jun 2024 06:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion