एक्स्प्लोर
Gajanan Maharaj Prakat Din : दर्यापुरातील विद्यार्थिनीने साकारली गजानन महाराजांची 54 स्क्वेअर फुटांची मनमोहक रांगोळी
Gajanan Maharaj Prakat Din 2023 : श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे. यानिमित्त अमरावतीमधील दर्यापूर इथल्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गजानन महाराज यांची रांगोळी साकारली.
Gajanan Maharaj Rangoli Amravati
1/10

श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे.
2/10

यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथल्या क्षिती रेवस्कर या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गजानन महाराज यांची रांगोळी साकारली.
3/10

श्रींच्या प्रकट दिनानिमित्त 54 स्क्वेअर फूट एवढी भव्य ही रांगोळी साकारली आहे.
4/10

या रांगोळीत गजानन महाराज यांनी पंढरीस बापूना काळ्यास विठ्ठल स्वरुपात दर्शन दिले, असा प्रसंग रेखाटला आहे
5/10

ही रांगोळी काढण्यासाठी या विद्यार्थिनीला तब्बल 16 तासाचा अवधी लागला.
6/10

अशाच प्रकारच्या रांगोळी क्षितीने नवरात्र, गणपती, दिपावली, दसरा निमित्ताने विविध रांगोळ्या साकारलेल्या होत्या.
7/10

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे.
8/10

महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील जवळपास एक हजारांच्या वर दिंड्यांसह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
9/10

श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.
10/10

महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराज यांच्यामुळे नावारुपाला आले आहे.
Published at : 13 Feb 2023 12:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























