एक्स्प्लोर
Chikhaldara :अबब..! चक्क 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; चिखदऱ्यात पर्यटकांची तूफान गर्दी
Amravati News : चिखदऱ्यात रविवारी(13 जुलै) पर्यटकांची तूफान गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले आहे. शिवाय संपूर्ण घाटात वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळले आहे.
Amravati News
1/5

अमरावती: मेळघाटाच्या कुशीत वसलेलं चिखदरा म्हणजे केवळ विदर्भाचेच नव्हे तर उभ्या राज्याचे नंदनवनच होय! अलीकडेच अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या आणि बघता बघता अवघ्या सातपुड्याने हिरवा शालू परिधान करत डोळ्याच पारणं फेडलं.
2/5

हे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली नसती तरच नवल. मात्र या पर्यटकांच्या गर्दीने नवा उच्चांक गाठला आहे. कारण रविवारी(13 जुलै) एकाच दिवशी चिखदऱ्यात पर्यटकांची तूफान गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले आहे.
Published at : 14 Jul 2025 12:53 PM (IST)
आणखी पाहा























