एक्स्प्लोर
देशातील सर्वात स्वच्छ हवा अमरावतीची; केंद्रीयमंत्र्यांच्याहस्ते गौरव, 75 लाख पारितोषिक
देशातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीची चर्चा होत होती. दिल्लीतील प्रदुषण हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.
Amravati first in swachha air city
1/7

देशातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीची चर्चा होत होती. दिल्लीतील प्रदुषण हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.
2/7

आता, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील अमरावती हेच क्रमांक 1 वर आहे.
3/7

देशात अमरावती शहराची हवा सर्वांत स्वच्छ असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून अमरावती शहाराला स्वच्छ वायू सर्वेक्षणात मानाचं पहिलं स्थान मिळालं आहे.
4/7

विदर्भातील अमरावती हे शहर देशातील सर्वात स्वच्छ असलेलं शहर असून शहराने पहिला क्रमांक पटकावत 75 लाखांचा पुरस्कार मिळवला आहे.
5/7

स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने 200 पैकी 200 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
6/7

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
7/7

महापालिका आयुक्तांना 75 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रासह स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी ठेवलेली स्वच्छता हेच या यशामागचे गमक आहे.
Published at : 09 Sep 2025 09:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























