एक्स्प्लोर
Pregnancy Tips: मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं असावं?
Pregnancy Tips
1/11

आजकाल अनेक मुली वयाच्या तिशीत लग्न करतात आणि त्यानंतर मुलं जन्माला घालण्याचा विचार करतात. काही स्त्रिया उशिरा लग्न करूनही मुलाचे नियोजन करण्यास उशीर करतात.
2/11

पण तोपर्यंत त्यांची तब्येत बरी नसते आणि त्यांना गर्भधारणेत अडचणी येतात. हे पुढे वंध्यत्वाचे कारण बनते.
3/11

प्रजनन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजकाल अनेक मुली वयाच्या 30 व्या वर्षी लग्न करतात आणि त्यानंतर मुले जन्माला घालण्याचा विचार करतात. काही स्त्रिया उशिरा लग्न करूनही मुलाचे नियोजन करण्यास उशीर करतात.
4/11

पण, तोपर्यंत त्यांची तब्येत बरी नसते आणि त्यांना गर्भधारणेत अडचणी येतात, जे पुढे वंध्यत्वाचे कारण बनते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बायोलॉजीनुसार आई होण्याचं वय 12 ते 51 वर्ष असू शकते. म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आणि रजोनिवृत्तीपूर्वी मुलगी आई होऊ शकते. पण आजकाल वयाच्या तिशी नंतरच मुलींना गर्भधारणा होण्यास त्रास होतो.
5/11

अनेक अहवालांमध्ये असे म्हटले गेले आहे की, स्त्रीचे मूल होण्यासाठी योग्य वय 20 ते 30 वर्ष आहे. वाढत्या वयानुसार, प्रजनन क्षमता कमी होऊ लागते आणि त्यांच्या एग्सचा दर्जाही कमी होतो.
6/11

काही स्त्रिया वाढत्या वयाबरोबर एंडोमेट्रिओसिसच्या समस्येला बळी पडतात. त्यामुळे त्यांना मूल होण्यास अडचणी येतात.
7/11

प्रजनन तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये वयाच्या 35 वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते आणि त्यांना मूल होण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वयाच्या 35 वर्षापूर्वी गर्भधारणेचा प्रयत्न केला पाहिजे. जो आई आणि बाळासाठी योग्य आहे.
8/11

मुलाचे नियोजन करण्यापूर्वी 'या' गोष्टीकडे लक्ष द्या: प्रजनन तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक स्त्रीने बाळाची योजना करण्यापूर्वी तिच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे महत्त्वाचे आहे.
9/11

त्याचप्रमाणे चांगला आहार घ्या आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोपही घेणंही गरजेचं आहे.
10/11

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
11/11

all photo credit : https://unsplash.com/s/photos/pregnancy
Published at : 17 Nov 2023 02:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























