एक्स्प्लोर

शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता अचानक बिबटयाने त्याच्यावर हल्ला केला.

नाशिक : शहराकडे धाव घेतलेल्या बिबट्याची (Leopard) गंभीर समस्या बनली असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही बिबट्याचा मुद्दा गाजला होता. पुणे जिल्ह्यात बिबट्याची संख्या मोठी असून शासनाने या बिबट्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी काही पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचेही वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले होते. मात्र, गावखेड्यात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. आता, नाशिकच्या सिन्नर (Nashik) तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तरुण आणि बिबट्या दोघे विहिरीत पडले आणि दोघांचाही मृत्यू झाला आहे.

सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात गोरख जाधव हा तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला होता, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास विहिरी जवळ जेवण करण्यासाठी बसला असता अचानक बिबटयाने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी घाबरलेल्या गोरखने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी स्वत:चा जीव वाचविण्याची धडपड करताना तो शेतातील विहिरीत पडला. मात्र, तरुणाचा पाठलाग करणाऱ्याने बिबट्याने पाठोपाठ विहीरीत उडी घेतली. याबाबत, ग्रामस्थांना माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस अधिकारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बिबट्या विहिरीत असताना गोरखला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिकांच्या मदतीने पिंजरा लावून वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले. तर, जीवरक्षकांच्या माध्यमातून गोरखचा विहिरीच्या तळाशी शोध सुरू केला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर, संबधितांनी विहिरीतून गोरखचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी, गावातील तरुण गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत बिबट्याला बाहेर काढण्यास विरोध केला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बिबट्या देखील 2 ते 3 तास पाण्यात असल्याने बिबट्याचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान, शेतातील तरुणावर केलेल्या आजच्या घटनेच्या आधीच काही वेळापूर्वी या बिबट्याने आणखी एका नागरिकावर हल्ला केला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे, ह्या थरारक घटनेने ग्रामस्थ बिबट्याच्या दहशती सावटाखाली आहेत.

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Kumbh Mela 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
Embed widget