एक्स्प्लोर

Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हत्याकांडानंतर राजकीय सोलापुरातील वर्तुळातूनही स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या खटाटोपातून हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज सोलापुरात (Solapur) मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, घडल्या प्रकाराबाबत मत व्यक्त करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. तसेच, आपण मुख्यमंत्र्‍यांना भेटणार असून राज ठाकरे यांच्याही कानावर ही घटना घातल्याचं त्यांनी म्हटलं.

महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत, मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस यांनी बघावं, असे म्हणत अमित ठाकरे यांनी सोलापुरातील घटनेवरुन संताप व्यक्त केला. अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका अशा निवडणुका? महाराष्ट्राची ही परिस्थिती आणून ठेवलीय तुम्ही, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे. तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवल हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? आपल्या सगळ्यातला माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपलं राज्य कुठे चालल आहे त्यांनी पाहिल पाहिजे, असेही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून म्हटले. तसेच, एक आई, दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget