एक्स्प्लोर
Travel Tips : प्रवास करताना 'या' 3 चुका करू नका!
Travel Tips : प्रवासाचा आनंद पूर्णपणे घ्यायचा असेल तर आरोग्याची आणि पोटाची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
Travel Tips
1/12

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रवास महत्त्वाचा आहे. कारण प्रवास केल्यानेच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
2/12

पण, प्रवासाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त आणि पोट पूर्णपणे ठिक असतं. अनेकदा लोक प्रवासात बाहेरचं अन्न खातात आणि मग पोटदुखी, गॅस किंवा जुलाबासारख्या समस्या निर्माण होतात.
3/12

अशा वेळी जर तुम्ही काही सोप्या सवयी वापरल्या तर तुमचा प्रवासही चांगला होईल आणि आरोग्यही चांगलं राहील.
4/12

नवीन ठिकाणं, वेगवेगळे पदार्थ आणि सुंदर निसर्ग पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
5/12

पण अनेकदा प्रवासाच्या दरम्यान अचानक पोट बिघडतं, लूज मोशन, गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
6/12

प्रवासाच्या वेळी दिनश्चर्या आणि आहारातील बदलांमुळे आपल्या पचनावर परिणाम होतो. तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न आणि कमी पाणी पिण्याची सवय ही काही कारणं ठरु शकतात.
7/12

त्याऐवजी दही भात, ओट्स, मूग डाळीची खिचडी किंवा फळं असा हलका आहार घ्यावा.
8/12

हा आहार पचायला सोपा असतो आणि पोट शांत ठेवण्यास मदत होते. प्रवासात अनेक लोकं कुठलंही पाणी पितात. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं.
9/12

म्हणून नेहमी शुद्ध पाण्याची बाटली जवळ ठेवावी आणि वेळोवेळी पाणी प्यावं. लांबच्या प्रवासात लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ग्लुकोजयुक्त पाणी पिणं उपयोगी ठरू शकतं.
10/12

जर पचनाशी संबंधित त्रास आधीपासून असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं सोबत ठेवावीत.
11/12

जर तुम्ही प्रवासात दही, ताक आणि फायबरयुक्त यांसारखे अन्न खाल्ले तर तुमचं पचन सुधारु शकतं.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 06 Nov 2025 04:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























