एक्स्प्लोर
PHOTO: 'हे' आहेत डोळ्यांचे गंभीर विकार...
मोतीबिंदू जगातील अंधत्वाचे प्रमुख कारण आहे.
Eye Disorders
1/10

जगात डोळ्यांच्या विकारांचे अनेक प्रकार आहेत. ज्यामुळे एखाद्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
2/10

ग्लूकोमा : ग्लूकोमा डोळ्यांच्या आत निर्माण झालेल्या दाबामुळे होणारा डोळ्यांचा विकार आहे. जर ग्लूकोमाच्य प्रारंभिक अवस्थेत शोध लागला नाही, तर काही वर्षात कायमची दृष्टी जाऊ शकते.
3/10

मोतीबिंदू : ही एक डोळ्यांची स्थिती आहे. ज्यामध्ये डोळ्यांची बाहुली आणि बुबुळाच्या मागे असलेली डोळ्यांची लेन्स कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. खरंतर, मोतीबिंदू जगातील अंधत्वाचे प्रमुख कारण आहे.
4/10

डायबेटिक रेटिनोपॅथी : मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्या गळतात किंवा फुगतात, रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
5/10

दृष्टिवैषम्य : दृष्टिवैषम्य काही प्रकरणांमध्ये थोडे गंभीर होऊ शकते. अशावेळी डोळ्यांवर पडणारा प्रकाश नीट वाकत नाही, त्यामुळे अंधुक दृष्टी येते. मात्र डोळ्यांची शस्त्रक्रिया किंवा कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा वापरून तो सहज बराही होऊ शकतो.
6/10

एम्ब्लियोपिया : एम्ब्लियोपिया हा मुलांमध्ये दृष्टीदोष होण्याचा एक सामान्य प्रकार आहे. या स्थितीत, एका डोळ्यातील दृष्टी कमी होते कारण मेंदूला डोळ्यांमधून योग्य दृश्य उत्तेजन मिळतं.
7/10

युव्हिटिस : युव्हिटिस या आजारामुळे डोळ्यांना सूज आणि जळजळ होऊ शकते आणि ऊती नष्ट होतात, ज्यामुळे दृष्टी कमी होते किंवा अंधत्व देखील येते.
8/10

हायफेमा : हायफेमा ही अशी स्थिती आहे जिथे डोळ्यांसमोर रक्त जमा होते. हे मुख्यतः बुबुळ आणि कॉर्निया दरम्यान गोळा केले जाते. नेत्रचिकित्सकाचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे, अन्यथा या नेत्रविकारामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात
9/10

हे सर्व विकार होऊ नये यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे यापैकी कोणताही विकार झाल्यास लवकरात लवकर निदान करून उपचार सुरू करावे अन्यथा दृष्टी जाण्याची शक्यता असते
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 12 Dec 2023 05:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























