एक्स्प्लोर
दारु जेवणाआधी प्यावी की जेवणानंतर...?; एक चूक पडू शकते महागात!
जेवणाआधी आणि जेवणानंतर मद्यपान केल्यास शरिरावर नेमका काय फरक पडतो हे समजून घ्या....
Drinking Alcohol
1/8

मद्यपान कऱणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, याची कल्पना असतानाही अनेकजण करतात. पण काही गोष्टी पाळल्यास तुमच्या शरिराला होणारं नुकसान कमी केलं जाऊ शकतं.
2/8

लग्न, पार्टी, डिनर, नाइट आऊट यावेळी अनेकजण मद्यपान करतात. अनेकांना जेवणाआधी तर काहींना जेवणानंतर मद्यपान करायला आवडतं.
3/8

जेवण्याच्याआधी पोट एकदम खाली व रिकामी असतं. अशावेळी शरीर प्यायलेली दारू लगेच पचवतं. त्यामुळे याचा परिणामही खूप लवकर दिसू लागतो.
4/8

जेवणाच्याआधी दारू पिणं हानिकारकही ठरू शकतं. कारण रिकाम्या पोटात दारू गेल्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते.
5/8

जेवणाच्याआधी खाली पोट असताना दारु प्यायलास शरीरात हाय कॅलरीज जाण्याचा धोका जास्त असतो, हे फूड चॉईस बरोबर नसल्यामुळे व जंक फुड जास्त पोटात गेल्यामुळे होते.
6/8

जेवल्यानंतर दारू प्यायल्यास आधीच पोटात अन्न असल्यामुळे शरीर दारू लवकर पचू देत नाही. ज्यामुळे ब्लड शुगरवर जास्त काही प्रभाव होत नाही. जेवणानंतर घेतलेलं अल्कोहोल पचन प्रक्रियेला संथ करते आणि अन्नाचे विघटन कमी प्रमाणात होतं. त्यामुळे पोटात गॅस, अपचन, आणि पोटफुगीसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
7/8

जेवल्यानंतर दारू पिणं पचनक्रियवर परिणाम करण्यासोबतच झोपण्याच्या रूटीनवर सुद्धा नकारात्मक परिणाम करतं.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 24 Sep 2024 09:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र























