पुढील पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
2/7
बीईएमएल येथे तयार होत असलेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी 10 कोटी रुपये खर्च येतो.
3/7
मुंबईतील मेट्रोसाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो गाड्यांचे आगमन येत्या आठवड्यात होत असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बंगरुळू येथे बीएचईएलच्या (भेल) कारखान्याला भेट देऊन या डब्यांची पाहणी केली व तिची वैशिष्ट्ये जाणून घेतली.
4/7
एकूण 576 कोचेस टप्प्याटप्प्यानं मुंबईत दाखल होणार आहेत. नव्या मेट्रो ट्रेन्ससाठी साडेचार हजार कोटींचं क्रॉन्ट्रॅक्ट बीईएमएल कंपनीला देण्यात आले आहे. भारतातच कोचची निर्मीती होत असल्यानं प्रत्येक कोच पाठीमागे 2 कोटी रुपये वाचणार आहेत.
5/7
मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए साठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरु होणार आहे. ट्रायल रनसाठी लवकरच बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल होणार आहेत. पहिला कोच येत्या 23 तारखेला मुंबईकडे रवाना होईल आणि 27 तारखेला पोहोचेल.
6/7
प्रवासी ये-जा करताना घसरून पडू नये यासाठी या डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग हा अँटी स्किडींग करण्यात आला आहे.
7/7
येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार असून सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाईल.