एक्स्प्लोर
सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडचा प्रेरणादायी प्रवास
sushant
1/6

सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पटना सारख्या शहरातून मुंबईत येणं आणि सर्वाचं आकर्षण असणाऱ्या बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख सुशांतने निर्माण केली होती.
2/6

सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सीरियल्समधून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. 'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानंतर टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'मधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. 2009 ते 2011 पर्यंत ही मालिका सुरु होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते.
3/6

टीव्हीनंतर 2013 साली 'काय पो चे' या सिनेमातून सुशांतसिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं होतं. त्यानंतर रोमॅन्टिक कॉमेडी 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमात सुशांत झळकला होता. या सिनेमात सुशांतसिंहसोबत परिनिती चोप्राही होती.
4/6

त्यानंतर 2015 साली 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी'मध्ये सुशांत हेराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सुशांतचा 'पीके' हा सर्वाधिक कमाई करणार सिनेमा ठरला होता. या सिनेमात सुशांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता.
5/6

सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दितील सर्वात हिट सिनेमा महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' होता. या चित्रपटाच्या अभिनयासाठी सुशांतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्काराचं नॉमिनेशन मिळालं होतं.
6/6

त्याचसोबत त्याचे 'केदारनाथ' आणि 'छिचोरे' यशस्वी सिनेमे ठरले होते.
Published at : 21 Jan 2022 12:40 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई


















