एक्स्प्लोर
Rohit Shetty Birthday: एकेकाळी 35 रुपये कमावणारा रोहित शेट्टी आज आहे जवळपास 300 कोटींचा मालक!
गोलमाल, सिंघम सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा रोहित शेट्टी आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
रोहित शेट्टी
1/9

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(all pc:रोहित शेट्टी/insta )
2/9

यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या यादीत चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या नावाचाही समावेश आहे.
3/9

एकेकाळी 35 रुपये कमावणारा रोहित आज जवळपास 300 कोटींचा मालक आहे.
4/9

अजय देवगणच्या 'फूल और कांटे' या पहिल्या चित्रपटापासून रोहितचा चित्रपट निर्माता म्हणून प्रवास सुरू झाला.
5/9

या चित्रपटाशी ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जोडले गेले होते. वयाच्या 17 व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये असिस्ट केल्यानंतर, रोहित शेट्टीने 2003 मध्ये दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
6/9

'जमीन' चित्रपटात त्याचा पहिला हिरो अजय देवगण होता. यानंतर रोहित शेट्टीने मेहनत करण्यापासून कधीच पाठ फिरवली नाही .
7/9

रोहित शेट्टीचा पहिला पगार फक्त 35 रुपये होता. पण आज तो एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतो.
8/9

दिग्दर्शकाने 'गोलमाल', 'चेन्नई एक्सप्रेस', 'सिंघम' सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
9/9

रोहितच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेटची एकूण संपत्ती 328 कोटी रुपये आहे. इंडस्ट्रीतील महागड्या दिग्दर्शकांमध्ये या दिग्दर्शकाच्या नावाचा समावेश होतो.
Published at : 14 Mar 2024 12:36 PM (IST)
आणखी पाहा























