Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Accident News: सुधा बिहारीलाल वर्मा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे तर राधा राममनोज वर्मा असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं (Pune Accident News) सत्र सुरूच आहे. अशातच पीएमपीएमएलच्या भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Pune Accident News) झाला, तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुधा बिहारीलाल वर्मा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे तर राधा राममनोज वर्मा असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमुळे ही घटना झाली असून चालक किरण भटू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Accident News)
बसने दोघींना उडवले, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू. पिंपरी चिंचवड मधील घटनेचा सीसीटीव्ही समोर
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 10, 2025
#Punenews #Bus #Accident pic.twitter.com/5n2EkkrUU4
राधा आणि तिचा पती तळवडे येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. ती गरोदर असल्याने मदतीसाठी दोन महिन्यांपूर्वी लहान बहीण सुधा हिला गावाकडून बोलावून घेतले होते. त्यांचा भाऊही सोबत राहण्यास असून तोही खासगी कंपनीत कामाला आहे. रात्रपाळी करून आल्यानंतर राधाचा पती मंगळवारी घरी झोपला होता. तर राधा कामावर गेली होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरी आली. जेवण करून सुधाला सोबत घेऊन पायी चालत कंपनीत परत कामावर जात होती. रस्ता ओलांडत असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सुधाचा मृत्यू झाला, तर राधा गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Pune Accident News: अपघातानंतर संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड
अपघातानंतर संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र देहूरोड पोलिसांनी परिसरातील जमावाला शांत केले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून दिली, काही काळ तळवडे-निगडी मार्गावरील बससेवा थांबवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. अपघातग्रस्त बस देहूरोड पोलिस ठाण्यात नेण्यात आली.
Pune Accident News: अपघातांचं सत्र कधी थांबणार?
हिंजवडी येथे १ डिसेंबर रोजी खासगी बसने चिरडल्याने तीन भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तळवडे येथे बसने धडक दिल्याने नऊवर्षीय चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. अपघातांची ही मालिका कधी थांबणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. पीएमपी चालकांकडून नियमांचे उल्लघंन केले जाते. बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.























