एक्स्प्लोर

Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी

लाडकी बहिण योजनेवरील चर्चेदरम्यान, विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana) अद्यापही चलती आहे. राज्यकर्त्यांकडून प्रत्येक कार्यक्रमात, भाषणात, निवडणूक प्रचारात आणि विधिमंडळात देखील लाडकी बहीण योजनेचा गववा केला जातो. लाडक्या बहि‍णींच्या आशीर्वादामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं असून लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देत आहेत. तर, विरोधकांकडून या योजनेमुळे सरकारवर होत असलेल्या आर्थिक कर्जावर भाष्य केलं जातं, तसेच या योजनेतील घोषणेप्रमाणे 2100 रुपये बहि‍णींना कधी मिळणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. विधिमंडळात आज लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार जयंत पाटील (Jayant patil) चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.

लाडकी बहिण योजनेवरील चर्चेदरम्यान, विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला, असे शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. त्यावर, मी वेगळं काही बोललो नाही, मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो तेच मी बोललो, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते तथा मंत्री शंभुराज देसाईंनी दिले. राज्य सरकारला या 'लाडक्या बहिण योजनेनं फायदा झाला' मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते 1 चे 2 नंबर झाले, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर, एकनाथ शिंदे कायम 2 नंबरचं राहतील असे नाही. पदांची अदलाबदल होत असते, असा पलटवार शंभुराज देसाई यांनी केला. 

जयंत पाटलांचे प्रश्न, आदिती तटकरेंचं उत्तर

निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का?, ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडीशन योजनांमध्ये घेतले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावर पहिल्याच शासन निर्णयातच 2 कोटी 63 लाख लोकांची पडताळणी सुरू केली. इतर विभागतही आम्ही डेटा तपासतोय. ई-केव्हायसीचं धोरण आणलं, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. केवायसीसाठी आता 13 कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, असं जयंत पाटील यांनी पुन्हा सभागृहात नमूद केलं. जयंत पाटील यांच्या या आरोपावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्तुत्तर दिलं. अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच KYC आपण केली अशी माहिती आदिती तटकरेंनी सभागृहात दिली. त्याचप्रमाणे ज्या पुरूषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले ती खाती तपासली जातील. या योजनेचा फायदा खरचं पुरूष घेत असेल तर नक्कीच कारवाई होईल, असं आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलं.

हेही वाचा

मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी 2 पोलिस अधिकारी सेवेतून बडतर्फ; नेमकं काय घडलं, कुठे केली चूक?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
Embed widget