तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Krishna Khopde on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडताना नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी कारभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

Krishna Khopde on Tukaram Mundhe: भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात लक्षवेधी मांडत निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता धमकीचे दोन कॉल आल्यानंतर कृष्णा खोपडे यांनी पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कृष्णा खोपडे यांनी म्हटलं आहे की मी दाखल केलेल्या लक्षवेधीनंतर तुकाराम मुंढे घाबरला आहे. त्याच्याच सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. कृष्णा खोपडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. त्यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर फोनवर धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याची तक्रार केली आहे.
कितीही धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही
त्यांनी म्हटले आहे की, तुकाराम मुंडे हा मीडिया आणि एनजीओ होता पण त्याचेच काही पेरोलवर ठेवलेले लोक मला धमकी देत आहेत. किती धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही. विधानसभेत तुकाराम मुंढेचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचा इशारा कृष्णा खोपडे यांनी दिला. दरम्यान, कृष्णा खोपडे यांनी काल रात्री दहा वाजून 47 मिनिटांनी आलेल्या दुसऱ्या धमकीनंतर वरील प्रतिक्रिया दिली आहे. खोपडे म्हणाले की, फोन करणाऱ्याने अजून जिवंत कसा आहे, असा सवाल केला. आमदार खोपडे यांनी या धमकीची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांना दिली आहे. खोपडे यांनी थेट आरोप केला आहे की, तुकाराम मुंढे यांनीच हा प्रकार घडवायला लावला आहे. हे सर्व तुकाराम मुंढेच्या इशाऱ्यावर होत आहे आणि या प्रकारात दोषी तुकाराम मुंढेच आहेत, कारण ते घाबरलेले आहेत. कृष्णा खोपडे दबणार नाही आणि मुंढे यांच्याशी दोन होत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
कृष्णा खोपडे यांनी कोणता आरोप केला?
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडताना नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी कारभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहार केल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी आपण कारवाईची मागणी करणार असल्याचे कृष्णा खोपडे यांनी म्हटलं होतं. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून, काही कारण नसताना 17 क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकले असाही आरोप केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























