निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयोगावर प्रहार करत राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक मोहिमा 3, 4 किंवा 5 महिने लांब चालतात, जेणेकरून पंतप्रधानांचे वेळापत्रक त्यात बसवता येईल.

Rahul Gandhi: निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांना का वगळण्यात आले? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर 2023 मध्ये, सरकारने कायदा का बदलला, ज्यामुळे निवडणूक आयुक्तांना त्यांच्या कोणत्याही कृतीसाठी शिक्षा केली जाऊ शकत नाही. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी 'अभूतपूर्व भेट' दिली नव्हती. निवडणुका झाल्यानंतर 45 दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) नष्ट करण्याची परवानगी देणारा कायदा का बदलला? हा डेटाचा प्रश्न नसून 'निवडणुका चोरण्याचा' प्रश्न असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणूक प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवणारी संस्था पकडली
राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांच्या समान भारताच्या कल्पनेचा नाश करण्याचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पाचा पुढील टप्पा म्हणजे भारतातील संस्थात्मक चौकटीवर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवणे. भारतीय विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची (Vice Chancellors) नियुक्ती योग्यता, क्षमता किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नसून ते विशिष्ट संघटनेचे सदस्य आहेत या आधारावर केली जाते. सीबीआय (CBI), ईडी (ED), आयकर विभाग (Income Tax Department) या संस्थांवर ताबा मिळवणे आणि त्यांच्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या तसेच विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या नोकरशहांना नियुक्त करणे, हा दुसरा संस्थात्मक ताबा आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवणारी संस्था पकडली गेली आहे.
भारत की जनता ये 3 बहुत ज़रूरी और सीधे सवाल पूछ रही है:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 10, 2025
1.CJI को EC चयन पैनल से क्यों हटाया?
2.2024 चुनाव से पहले EC को लगभग पूरी कानूनी इम्युनिटी क्यों दी?
3.CCTV फुटेज 45 दिन में नष्ट करने की इतनी जल्दबाज़ी क्यों?
जवाब एक ही है - BJP चुनाव आयोग को वोट चोरी करने का औज़ार बना… pic.twitter.com/ZOcybz89jL
हरियाणाची निवडणूक चोरीला गेली होती
निवडणूक आयोगावर प्रहार करत राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक मोहिमा 3, 4 किंवा 5 महिने लांब चालतात, जेणेकरून पंतप्रधानांचे वेळापत्रक त्यात बसवता येईल. हरियाणातील मतदार यादीत एका ब्राझिलियन महिलेचे नाव 22 वेळा आले आहे, तर एका बुथमध्ये एका महिलेचे नाव 200 हून अधिक वेळा आले आहे. हरियाणाची निवडणूक चोरीला गेली होती आणि निवडणूक आयुक्तांनी ती चोरी निश्चित केली होती. निवडणूक आयोग बोगस मतदारांबाबत प्रश्नांची उत्तरे देत नाही. बिहारच्या मतदार यादीत 1.2 लाख बोगस फोटो आजही आढळतात, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातही असे प्रकार सिद्ध झाले आहेत.
सर्व राजकीय पक्षांना मशीन-रीडेबल मतदार याद्या द्याव्यात
राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीच्या एक महिना आधी सर्व राजकीय पक्षांना मशीन-रीडेबल मतदार याद्या द्याव्यात. सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याची परवानगी देणारा कायदा त्वरित मागे घ्यावा. ईव्हीएमचे (EVM) आर्किटेक्चर (रचना) उपलब्ध करून द्यावे आणि तज्ज्ञांना ईव्हीएम तपासण्याची परवानगी द्यावी. निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून मुक्तता देणारा कायदा बदला.
इतर महत्वाच्या बातम्या























