एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?

Maharashtra Winter Session Nagpur 2025: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनाच्या चलानबाबत सभागृहात चर्चा झाली.

Maharashtra Winter Session Nagpur 2025: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनाच्या चलानबाबत सभागृहात चर्चा झाली. चाळीच्या आजूबाजूला कोणतीही पार्किंगची सुविधा नाही. चाळीचे लोक इमारतीमध्ये गेले, पण त्यांना दुचाकीसाठी पार्किंग द्यावी. तसेच ट्राफीक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढत असताना अनेक ठिकाणी मारामारीचे व्हिडीओ येतात. चलानाचे SMS देखील उशिरा येतात, असा प्रश्न (E-Challan Payment) भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सभागृहात मांडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तर दिलं. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)

चलान लवकर कसे वसूल करण्यात येतील याकडे लक्ष दिले जाणार- (Devendra Fadnavis On E-Challan)

चलान आकरल्यानंतर अनेकांना उशीरा SMS येतात, हे तथ्य आहे. चलान लवकर जावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे चलान लवकरात लवकर कसे वसूल करण्यात येतील याकडे लक्ष दिले जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात जसे बॉडी कॅमेरे आहेत ते सिस्टीम महाराष्ट्रात आणण्याचा विचार आहे. टप्याटप्याने बॉडी कॅमेरे आणण्यात येणार आहेत. बॉडी कॅमेरे हवेत, कारण अनेक भांडणाचे व्हिडीओ येतात. तू मेरे को पेहचानता नही क्या? वैगरे बोलतात, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात नियमावली तयार करणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा- (Devendra Fadnavis On E-Challan Payment)

अनेक राज्यात चलान संदर्भात विविध नियम आहेत. ज्या मशीन दिले जाणार आहेत ते फास्टटॅगशी कनेक्ट करता येईल का? कारण चलान भरले जात नाहीत, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मांडला. यावर जे लोक चलान भरत नाहीत, त्यांना पेट्रोल देऊ नये, असा काही कायदा करावा लागेल किंवा AI चा वापर करून तंत्रज्ञान आणावं लागेल, असं शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या. यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात योग्य ती नियमावली तयार केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. 

नगरविकास खात्याकडून आदेश दिले जाणार- (Devendra Fadnavis On Mumbai Parking)

आपण मोठं बांधकाम करत असताना दुचाकीसाठी पार्किंग दिली जात नाही. बीडीडीसाठी देखील आधी पार्किंग देण्यात आली नव्हती. ती नंतर दिली गेली. आता दुचाकी पार्किंग करण्यात यावी यासाठी नगरविकास खात्याकडून आदेश दिले जातील, कशाप्रकारे उपाय योजना करायला हवी, याबाबतही सूचना देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

विधानपरिष सभागृह Live Video:

संबंधित बातमी:

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget